Posts

‘कोरोना आवडतो कुणाला?'

Image
  ‘प्रहार’ रविवार, दि. ३० मे २०२१ ‘कोरोना आवडतो कुणाला?' (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, ‘दै.देशोन्नती’ ) 'इनफ इज इनफ'अशी इंग्रजीत एक म्हण आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी लोकांना सांगू इच्छितो की जगात आजूबाजूला काय चाललेय ते बघा आणि त्या दृष्टीकोनातून वागायला लागा, अन्यथा तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही...      देशात जगभरात कोरोनाच्या नावाखाली नंगानाच सुरू आहे, अनेक देश, कुटुंब, उद्योग उद्ध्वस्त झालेत; मात्र या काळात       पंतप्रधानांनी संपूर्ण पगार घेतला.      खासदारांनी संपूर्ण पगार घेतला.      मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण पगार घेतला.      मंत्र्यांनी संपूर्ण पगार घेतला.      आमदारांनी संपूर्ण पगार घेतला.      महापौरांनी संपूर्ण पगार घेतला.      नगराध्यक्षांनी संपूर्ण पगार घेतला.      नगरसेवकांनी संपूर्ण पगार घेतला.      सरपंचांनी संपूर्ण मानधन घेतले.      ग्रामसेवकांनी संपूर्ण पगार घेतला.      एवढेच नाही तर केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, झेड पी, नगरपालिका कर्मचारी आणि सर्व सरकारी शिक्षक, प्राध्यापक, कोर्टातील कर्मचारी यांनीसुद्धा घरी बसून फुकटचा संपूर्ण पगा

कुणाचे ओझे कुणाच्या पाठीवर ...!

Image
  ‘प्रहार’ रविवार, दि. ३० मे २०२१ कुणाचे ओझे कुणाच्या पाठीवर ...! (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, ‘दै.देशोन्नती’ ) केंद्राच्या तिजोरीत काही मोजक्या राज्यांनी आपल्या कष्टाचा पैसा ओतायचा आणि आळशी राज्यांनी त्यावर डल्ला मारत चैन करायची, हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. एका आकडेवारीवर नजर टाकली तर हे चित्र अगदी पुरेसे स्पष्ट होईल. महाराष्ट्र केंद्राच्या तिजोरीत दरवर्षी दरडोई साधारण ३२ हजार रूपयांची भर घालत असतो, गुजरात २० हजार, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक ही दक्षिणेकडील राज्येदेखील दरवर्षी दरडोई २० ते २५ हजारांची भर केंद्रीय तिजोरीत घालतात. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, प.बंगाल ही राज्ये त्या तुलनेत नगण्य म्हणजे साधारण पाच ते सहा हजारांची भर घालतात. केंद्राकडे जमा झालेला हा पैसा समन्यायी पद्धतीने वाटला जाणे अपेक्षित आहे, थोडाफार फरक क्षम्य आहे; परंतु या राज्यांना मिळणाऱ्या परताव्याचे आकडे पाहिले, तर या देशात कुणाचे ओझे कुणाच्या पाठीवर, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भारत हा संघराज्य देश आहे, तसा अमेरिकादेखील आहे, परंतु भारतातील राज्यांना तुलनेत तितके अधिकार नाहीत. संविध

एक लढाई ,देशोन्नतीची....

Image
  एक लढाई ,देशोन्नतीची.... कोरोना महामारीच्या अनावश्यक भय व आतंका विरुध्द दवाखान्यातील भयानक लुटी विरुद्ध कोरोनाचे नवीन निकष आणि प्रतिबंध कायद्याने डॉक्टर आणि हॉस्पिटलवर बंधनकारक १).प्रशासनातील अधिकारी आणि मेडिकल माफियाच्या संगनमताने रेम्डेसिवीर इंजेक्शनचा मोठा काळाबाजार करून एक लाख कोटी रूपयांचा महाघोटाळा कोरोनाच्या या घोर आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. कोरोनाचे मान्यताप्राप्त आणि रामबाण औषध नसतांनाही लाखो नव्हे तर करोडो रुग्णांना देशभरात रेम्डेसिवीर सारखे विषारी इंजेक्शन सर्रास लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे लिव्हर, किडनी, हृदय फेल होऊन लोक हॉस्पिटल्स मध्ये किडया-मुंग्यांसारखी मरण पावली. देशभर कोरोना रूग्णांच्या नातेवाइकांनी अत्यंत हाल-अपेष्टा सहन करत मिळेल त्या किमतीत, मिळेल तिथून रातोरात पाचशे-हजार किलोमीटरचा प्रवास करून आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविण्यासाठी रेम्डेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टरला आणून दिले. अगतिक रुग्णाच्या खिशातून षड्यंत्र करून हजारो-लाखो रुपये लुटण्यात आले. ज्याची खरी किंमत रु.६४/- होती. त्या रेम्डेसिव्हिर चे पॅकेट वर रू. ५,४००/- प्रति इंजेक्शन असे एमआरपी छापून,

हतबल मुख्यमंत्री आणि निर्ढावलेले प्रशासन...!

Image
‘प्रहार’ रविवार, दि. १८  एप्रिल २०२१ हतबल मुख्यमंत्री आणि निर्ढावलेले प्रशासन...!    (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)  महाराष्ट्रातील कोरोना आता एक राजकीय आजार आणि हत्यार ठरू पाहत आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या आणि महाराष्ट्रात आपली सत्ता आणू पाहणार्‍या भाजपच्या खेळीला अननुभवी उद्धव ठाकरे सरकार बळी पडत आहे. तसे नसते तर या सरकारने लॉकडाऊन करीत जनतेत असंतोष निर्माण होऊ दिला नसता.     कोणत्याही कारणाने परिस्थिती बिघडली, सर्वसामान्यांना त्रास होऊ लागला की कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य असते की परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे. महाराष्ट्र सरकारला मात्र परिस्थिती पूर्वपदावर आणण्यापेक्षा चिघळविण्यातच अधिक रस दिसत आहे.      सध्या कोरोना काळात या सरकारकडे सगळ्या प्रश्नावर बंदी हेच एकमेव उत्तर आहे. त्यात सरकारमधील अंतर्गत कलहामुळे म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणाने हे सरकार प्रशासनावर मोठ्या प्रमाणात विसंबून असल्याचे दिसते.     यापूर्वीचे मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यमंत्री सुद्धा न होता थेट मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळापासून प्रश

टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा...!

Image
‘प्रहार’ रविवार, दि. ४  एप्रिल २०२१ टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा...!    (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)  लोकांचे मनोधैर्य कायम राखायचे असेल, तर सरकारने सकारात्मक पाऊल उचलायला हवे. अनेक आजार केवळ मानसिक दौर्बल्यातूनही बळावत असतात. सध्या तर साधा खोकला, सर्दी, ताप असलेला माणूसही कोरोनाच्या धास्तीने अर्धमेला होत आहे. लोकांच्या मनातील ही भीती काढणे गरजेचे आहे, ही भीती काढण्याऐवजी छाती दडपणारे आकडे आणि कठोर टाळेबंदीच्या धमक्या देऊन सामान्य लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरच सरकार प्रहार करीत असल्याचे दिसते.       राज्यावर किंवा देशावर एखादे संकट कोसळले किंवा कोसळू पाहत असेल, तर राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य राज्यातील जनतेला धीर देणे, सरकार लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याबाबत लोकांना आश्वस्त करणे हेच असते; परंतु इथे सगळे उलटेच पाहायला मिळत आहे. दर दिवशी आकडेवारीचा बागूलबुवा उभा करीत आधीच भेदरलेल्या लोकांना अधिक घाबरविण्याचे काम सरकार करीत आहे. त्यात अजून भर घालीत निर्बंध, कठोर निर्बंध, मर्यादित टाळेबंदी, कठोर टाळेबंदी असे शब्दप्रयोग र
Image
  ‘प्रहार’   रविवार, दि. २८  फेब्रुवारी २०२१ ‘शेतकरी जगला , तरच  देश जगेल!'    (लेखक :  प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष, ‘किसान ब्रिगेड’)  असे म्हणतात की, 'अगर सड़कें खामोश हो जांए तो संसद आवारा हो जाएगी...!' हे जाणूनच दिल्लीत लाखो शेतकरी सलग तीन महिन्यांपासून घरदार सोडून आणि लाखो ट्रॅक्टर घेऊन देशभरातल्या शेतकर्‍यांच्या हक्काची लढाई जेव्हा लढत आहेत, तेव्हा आपण किमान सायकल मार्च तर काढू शकतो!!! त्यामुळे यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता 'किसान ब्रिगेड'तर्फे ३ मार्च ते १७ मार्च, अशी १४ दिवसांची सायकल यात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ३ तारखेला मातृतीर्थ सिंदखेडराजाहून या सायकल यात्रेला प्रारंभ होणार आहे. वाशिम, यवतमाळ, नांदेड, वर्धा, अमरावती मार्गे अकोल्याला समारोप असा ६ जिल्ह्यांतील एकंदर ९०० कि.मी.चा प्रवास ही यात्रा करणार आहे. समाजातील प्रत्येक जण या यात्रेत सहभाग घेऊ शकतो.          तुम्ही जंगलात आग लागली असताना चोचीत पाणी नेऊन टाकणार्‍या चिमणीची बोधकथा ऐकली असेल. जंगलाला जेव्हा आग लागली तेव्हा सर्व प्राणी,